फुलांनी गाडी सजवून पोलिस अधिक्षक ज्योतीप्रिया यांना निरोप

लेडी सिंघम म्हणून परीचित असलेल्या जालन्याच्या पोलिस अधिक्षक ज्योतिप्रिया सिंग यांना निरोप देण्यात आला. तीन वर्षांपासून जालन्यात पोलिस अधिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या ज्योतिप्रिया सिंग यांची पुण्यामध्ये पोलिस उपायुक्तपदी बदली झालीय. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 2, 2017, 03:51 PM IST
 फुलांनी गाडी सजवून पोलिस अधिक्षक ज्योतीप्रिया यांना निरोप title=

नीतेश महाजन, झी मीडिया, जालना : लेडी सिंघम म्हणून परीचित असलेल्या जालन्याच्या पोलिस अधिक्षक ज्योतिप्रिया सिंग यांना निरोप देण्यात आला. तीन वर्षांपासून जालन्यात पोलिस अधिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या ज्योतिप्रिया सिंग यांची पुण्यामध्ये पोलिस उपायुक्तपदी बदली झालीय. 

सिंग यांचा पदभार रामनाथ पोकळे यांनी पोलिस अधिक्षक म्हणून स्वीकारला आहे.  मावळत्या पोलिस अधिक्षक ज्योतिप्रिया सिंग यांना निरोप देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आवडत्या पोलिस अधिक्षकांना निरोप देण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पोलिस अधिक्षकांच्या गाड़ीला ख़ास विविध प्रकारच्या फुलांनी सजवलं होतं. या गाडीमध्ये ज्योतीप्रिया यांना बसवूनच त्यांना  सर्व अधिकाऱ्यांनी निरोप दिला. अप्पर पोलिस अधिक्षक राहुल माकनिकर यांना देखिल अधिकाऱ्यांनी अशाच अनोख्या प्रकारे निरोप दिला. 

तीन वर्षाच्या कारकिर्दीत पोलिस अधिक्षक ज्योतिप्रिया सिंग यांनी जालना  जिल्ह्यातील अवैध धंद्याना लगाम लावला. त्यामुळे त्यांची तीन वर्षांची कारकीर्द चांगलीच गाजली. आता त्यांची पुण्यात पोलिस उपायुक्तपदी निवड झाल्याने त्यांना निरोप देण्यात आला. आज रामनाथ पोकळे जालना जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक म्हणून रुजू होणार आहेत.