नाशिकमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत

नाशिक शहरात सध्या मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाल्यामुळं दहशत पसरलीय. 

Updated: May 2, 2017, 02:39 PM IST
नाशिकमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत title=

नाशिक : नाशिक शहरात सध्या मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाल्यामुळं दहशत पसरलीय. 

सोमवारी दुपारी उत्तम नगर राजरत्न नगर परिसरातील 8 ते 10 लहान मुलांना मोकाट कुत्र्याने चावा घेतला, तर 10 ते 15 जणांवर कुत्रा धावून गेला. 

मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिका श्वान निर्बीजीकरणाचे कंत्राट देते. मात्र कुत्र्यांची संख्या कमी होत नसल्याने महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय.