'गणेश'गर्दीत हात साफ करणारा चोर भक्तांच्या तावडीत सापडला अन्...

गणेशोत्सवादरम्यान तुमच्या वस्तू सांभाळा... कारण गर्दीचा फायदा घेऊन हात साफ करणारे कदाचित तुमच्याही आजूबाजूला फिरत असतील.... अशीच घटना आज जळगावातही घडली... 

Updated: Sep 17, 2015, 07:56 PM IST
'गणेश'गर्दीत हात साफ करणारा चोर भक्तांच्या तावडीत सापडला अन्... title=

जळगाव : गणेशोत्सवादरम्यान तुमच्या वस्तू सांभाळा... कारण गर्दीचा फायदा घेऊन हात साफ करणारे कदाचित तुमच्याही आजूबाजूला फिरत असतील.... अशीच घटना आज जळगावातही घडली... 

सारे गणेश भक्त गणरायाच्या खरेदीत मग्न असताना गर्दीचा फायदा घेऊन जळगावमध्ये मोबाईल चोरीची संधी एका चोरानं साधली खरी... पण, त्याची ही चोरी आजुबाजूच्या लोकांच्या लक्षातही आली. 

मग काय... संतापलेल्या भक्तांनी मग आपरला हात दुखेपर्यंत या चोराची मनसोक्त धुलाई केली. लाथा - बुक्यांनी मारहाण झालेल्या या मोबाईल चोराचे अवसान गळून पडलं. 

जवळच उपस्थित असलेल्या वाहतूक पोलिसांनी या चोरट्याला जमावाच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला खरा... पण, तो निष्फळ ठरला. मारहाण झाल्यानंतर या चोराला धड उभंही राहता येत नव्हतं. खिळखिळं झालेलं हे 'पार्सल' मग जमावानंच पोलीस ठाण्यात पोहचवलं.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.