जलयुक्त शिवार योजनेपासून सर्वसामान्य दूर

जमीनीतील पाण्याची पातळी वाढावी, टंचाईग्रस्त गावांना पाणी टंचाई भासू नये, यासाठी शासनाने काही गावांमध्ये जलयुक्त शिवार योजना राबवण्यास सुरूवात केली आहे. राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची या योजनेमागे आग्रही भूमिका राहिलेली आहे. जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील २१ गावांमध्ये ही योजना राबवण्यात येत आहे.

Updated: Jan 3, 2015, 07:12 PM IST
जलयुक्त शिवार योजनेपासून सर्वसामान्य दूर title=

जळगाव : जमीनीतील पाण्याची पातळी वाढावी, टंचाईग्रस्त गावांना पाणी टंचाई भासू नये, यासाठी शासनाने काही गावांमध्ये जलयुक्त शिवार योजना राबवण्यास सुरूवात केली आहे. राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची या योजनेमागे आग्रही भूमिका राहिलेली आहे. जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील २१ गावांमध्ये ही योजना राबवण्यात येत आहे.

मात्र या योजनेची पहिल्याच टप्प्यात वाट लागतांना दिसतेय, कारण ज्या गावांचा या योजनेत समावेश आहे. या गावातील किती शेतकरी शेततळी खोदून घेण्यास उत्सुक आहेत, हे प्रमाण कमी असेल तर ते कसं वाढवता येईल, गावातील कोणत्या नाल्यांचं खोदकाम केलं जाईल. कुठे नाल्याचं सरळीकरण करण्यात येईल, याची कोणतीही माहिती गावातील ग्राम पंचायतील अथवा, शेतकऱ्यांना देण्यात आलेली नाही.

मात्र त्या आधीच या योजनेसाठी नाल्यांचं खोदकाम सुरू झाल्याचे फोटो झळकायला लागले आहेत. यामुळे योजनेसाठी नेमका किती निधी मंजूर आहे, तो कुठे किती प्रमाणात खर्च केला जाईल, याचं कंत्राट कसं असेल, याबाबतीत कोणतीही माहिती प्रसिद्धीस आलेली नसतांना कामाला सुरूवात झाल्याने, अधिकाऱ्यांच्या भूमिकेविषयी चर्चा होत आहे.

शेतकऱ्यांशी संवाद साधण्याची गरज
जलयुक्त शिवार योजनेचा आराखडा हा दोन दिवसात ठरवण्यात आल्याचंही सांगण्यात येतंय. हा आराखडा तात्काळ मंजूर झालाय, पण यात कोणती कामं मंजूर आहेत, त्यावर किती खर्च होणार आहे, हे अजुनही गुलदस्त्यात असल्यासारखचं आहे.

हे सामान्य जनतेसाठी तहसिल आणि संबंधित  ग्रामपंचायतींसमोर प्रसिद्धीस देण्यात येण्याची मागणी सर्वसामान्य शेतकऱ्यांकडून होत आहे.

जनतेपर्यंत ही माहिती संबंधित तहसिलदार आणि प्रांताधिकाऱ्यांनी महसूल यंत्रणेच्या माध्यमातून, तसेच जलयुक्त शिवार योजनेची काम कोणत्या तालुक्यांमध्ये कुठे सुरू आहेत, कामाचा प्रकार काय आहे, यावरील अंदाजित खर्च किती आहे, ही माहिती  ऑनलाईन देण्याची मागणी होत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.