कडोंमपात भाजप नेत्यांनीच केला मुख्यमंत्र्यांचा डाव?

नुकत्याच कल्याण डोंबिवली निवडणुका पार पडल्यात... निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाहीर सभेत शिवनेसेनेला तोडीस तोड प्रत्यूत्तर देताना दिसले... पण, या निवडणुकीत भाजपचा दुसरा एकही बडा नेता मुख्यमंत्र्यांना साथ देऊन रणांगणात उतरलेला दिसला नाही... 

ANI | Updated: Nov 6, 2015, 02:59 PM IST
कडोंमपात भाजप नेत्यांनीच केला मुख्यमंत्र्यांचा डाव? title=

कल्याण : नुकत्याच कल्याण डोंबिवली निवडणुका पार पडल्यात... निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाहीर सभेत शिवनेसेनेला तोडीस तोड प्रत्यूत्तर देताना दिसले... पण, या निवडणुकीत भाजपचा दुसरा एकही बडा नेता मुख्यमंत्र्यांना साथ देऊन रणांगणात उतरलेला दिसला नाही... यावर मात्र आता आश्चर्य व्यक्त केलं जातंय. 

अधिक वाचा - मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे मात्र अनुपस्थितीत

स्वत: मुख्यमंत्रीच निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरलेत म्हटल्यानंतर बाकीच्या बड़्या नेत्यांनी त्याकडे पाठच फिरवलेली दिसली. भाजपच्या मंत्र्यांची एकी काही इथे दिसून आली नाही. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे या नेत्यांनीही या निवडणुकीकडे फारसं लक्ष दिलं नाही.

अधिक वाचा - शिवसेनेचे पारडं जड, मनसेचं इंजिन यार्डातच राहणार का?

हा मुख्यमंत्र्यांना एकटं पाडण्याचा डाव होता? मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय म्हटल्यावर मज्जा पाहण्याची संधी भाजपच्या नेत्यांना मिळाली? अपयशही मुख्यमंत्र्यांच्याच माथी मारण्याची वेगळी संधी भाजपच्या इतर नेत्यांना मिळाली? असे नानाविध प्रश्न आता या निवडणुकीवर बारीक लक्ष ठेऊन असणाऱ्या अनेकांना पडलेत. 

अधिक वाचा - केडीएमसी : भाजपने दिली शिवसेनेला महापौरपदासाठी ऑफर

त्यामुळे विरोधक, मित्रपक्ष असलेला पण विरोधकांचं काम करणारी शिवसेना आणि आता स्वकीयही... एवढ्या सगळ्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकट्यानेच लढतायत की काय? असं चित्र आता निर्माण झालंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.