कर्ज वसुलीसाठी सावकाराने कर्जदाराची किडनी विकली

अकोल्यात कर्जाची परतफेड करण्यासाठी सावकाराने, कर्जदाराची किडनी विकून कर्ज वसूल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अकोल्यात माणूसकीला काळीमा फासणारा प्रकार उघड झालाय. 

Updated: Dec 2, 2015, 04:42 PM IST
कर्ज वसुलीसाठी सावकाराने कर्जदाराची किडनी विकली title=

अकोला : अकोल्यात कर्जाची परतफेड करण्यासाठी सावकाराने, कर्जदाराची किडनी विकून कर्ज वसूल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अकोल्यात माणूसकीला काळीमा फासणारा प्रकार उघड झालाय. 

कर्ज घेणाऱ्या व्यक्तीने पैसे परत केले नाहीत म्हणून सावकाराने किडनी विकली. परदेशात नेऊन किडनी विकून सावकाराने पैसे वसूल केले आहेत.

किडनी विकली पण...
या प्रकरणी सावकारासह एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे, सावकाराकडून २० हजारांचं कर्ज या व्यक्तीने घेतलं होतं. यावर वसुली होत नसल्याने, या व्यक्तीने आपण तुझी किडनी विकू, ती लाखोत जाईल, माझे पैसे व्याजासह काढून तुझे पैसे तुला परत देऊ, असं सावकाराने त्याला सांगितलं.

असं फुटलं बिंग
सावकाराने सांगितल्यानुसार या व्यक्तीने आपली किडनी परदेशात जाऊन विकली, याबदल्यात साडेचार लाख रूपये देण्याचं आमिष त्याला देण्यात आलं, मात्र प्रत्यक्षात श्रीलंकेत किडनी विकून आल्यानंतरही त्याला पैसे मिळाले नाहीत, म्हणून हा आरोपी पोलिसांकडे गेला. यानंतर बिंग फुटल्याने पोलिसांनी आरोपींच्या घरी छापे टाकले यात आरोपीसह किडनी विकल्याचा आरोप करणाऱ्या व्यक्तीचा पासपोर्ट सापडला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.