जेलवारी टाळण्यासाठी त्यानं केला खून...

स्वतःची जेलवारी टाळण्यासाठी थेट खूनासारखं टोकाचं पाऊल उचललेल्या कुख्यात गुंडाला, कोल्हापूर पोलिसांच्या गुन्हे शाखेनं शिताफीनं अटक केली आहे. कितीही पुरावा नष्ट करायचा प्रयत्न केला तरी, गुन्हा लपून राहत नाही हेच यातून पुन्हा एकदा दिसून आलंय.

Updated: May 26, 2015, 09:25 PM IST
जेलवारी टाळण्यासाठी त्यानं केला खून... title=

कोल्हापूर : स्वतःची जेलवारी टाळण्यासाठी थेट खूनासारखं टोकाचं पाऊल उचललेल्या कुख्यात गुंडाला, कोल्हापूर पोलिसांच्या गुन्हे शाखेनं शिताफीनं अटक केली आहे. कितीही पुरावा नष्ट करायचा प्रयत्न केला तरी, गुन्हा लपून राहत नाही हेच यातून पुन्हा एकदा दिसून आलंय.

कुख्यात गुंड लहू ढेकणे त्याचा पॅरोल संपल्यानंतरही कोल्हापुरातल्या कळंबा कारागृहात हजर होणं टाळत होता. कोठडीची ब्याद कायमची टळावी यासाठी त्यानं, जे पाऊल उचललं ते महाभयंकर होतं. लहू ढेकणे यानं पाळत ठेऊन दत्तात्रय नायकुडे  या दारुचं व्यसन असलेल्याला कामगाराला हेरलं आणि कामाच्या निमित्तानं ढेकणेनं नायकुडेला दारु पाजून त्याची अत्यंत निर्घृण हत्या केली. हत्या केलेल्या नायकुडेचा मृतदेह आपलाच असल्याचं भासवून, स्वतःची शिक्षा चुकवण्याचा ढेकणेचा यामागे डाव होता. मात्र, चाणाक्ष पोलिसांनी चिकाटीनं तपास करत, अखेर लहू ढेकणेला बेड्या ठोकल्याच, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक अमरसिंह जाधव यांनी दिली.

गुंड लहू ढेकणे याच्या नावावर याआधीही खून, अपहरण, यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. अशाच एका गुन्ह्यासाठी ठोठावलेली शिक्षा टाळण्याकरता, अविचारी ढेकणेनं आणखी एक गंभीर गुन्हा केलाय. म्हणून त्याला फाशीचीच शिक्षा व्हावी असा प्रयत्न आता पोलिसांकडून न्यायालयात केला जाणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.