तावडेजी आपली घोषणा विसरलात का?

पुण्यातल्या शिक्षण प्रसारक मंडळी ट्रस्टच्या गैरकाराभारांची चौकशी करुन दोषींवर कारवाई करणार, ही आपलीच घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे  हेतूपुरस्पर विसरुन गेले असल्याचं एकंदर स्थितीवरुन दिसून येतंय.

Updated: May 26, 2015, 08:40 PM IST
तावडेजी आपली घोषणा विसरलात का? title=

पुणे : पुण्यातल्या शिक्षण प्रसारक मंडळी ट्रस्टच्या गैरकाराभारांची चौकशी करुन दोषींवर कारवाई करणार, ही आपलीच घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे  हेतूपुरस्पर विसरुन गेले असल्याचं एकंदर स्थितीवरुन दिसून येतंय.

'झी मीडिया' आणि इंग्रजी दैनिक 'डीएनए' यांनी शिक्षण प्रसारक मंडळीतला गैरकारभार सर्वप्रथम उघड केला. त्याची दखल घेत २ मे रोजी विनोद तावडे यांनी दोषींवर कारवाईची घोषणाही केली होती.

मात्र, या प्रकरणात आतापर्यंत प्रत्यक्षात काहीच कृती झालेली नाही. याबाबत काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना विचारलं असता, त्यांनीही त्यावर बोलणं टाळलं होतं.

दरम्यान याच प्रश्नी सातत्यानं तावडेंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. ही चौकशी टाळण्यामागे काही हेतू आहेत का? अशी शंका त्यामुळं निर्माण झालीय.
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.