मुंबई : कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांत जेवण बनवताना होणारा कचरा सध्या रेल्वेमार्गांतच टाकला जातो. तो एका पिशवीत जमा करून रत्नागिरी आणि मडगाव स्थानकांवर रेल्वे कर्मचाऱ्यांना देऊन त्यांना २० किलोमागे ५० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मोहिमेचा आदर्श ठेवत रेल्वे कर्मचाऱ्यांत जागरूकता निर्माण करण्यासाठी ही योजना राबवण्यात येणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी वैशाली पतंगे यांनी दिली.
मात्र जैविक व अजैविक कचरा वेगवेगळा गोळा करावा लागणार आहे. या कचऱ्याची पर्यावरणाची हानी होऊ न देता विल्हेवाट लावण्यासाठी कोकण रेल्वे येथे प्रत्येकी एक - एक कचरा विघटन करण्याची मशीन उभारणार आहे. त्यात जैविक कचऱ्याचे कंपोस्ट खत तयार केले जाईल व अन्य कचऱ्याची विल्हेवाट लावली जाईल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.