नाशिक : नाशिकमध्ये आखाड्याच्या मिरवणुकांना सुरुवात झालीय. शाही स्नान मिरवणुकीला सुरुवात झाली. निर्वाणी अनि, निर्मोही अनि आणि दिगंबर अनि आखाड्याच्या मिरवणुकांना सुरुवात झालीय.
नाशिकमध्ये रामकुंडावर सकाळी सात वाजता निर्वाणी अनी आखाड्याचं शाही स्नान झालं. या आखाड्याचे प्रमुख ग्यानदास महाराज यांनी सर्वप्रथम रामकुंडावर स्नान केलं. परंपरेनुसार सर्वप्रथम शाही स्नान करण्याचा मान निर्वाणी अनी आखाड्याचा आहे.
रामकुंडावर प्रथम मानाच्या निर्वाणी आखाड्याचं स्नान झालं. त्यानंतर दिगंबर आखाड्यातील साधुंचं शाही स्नान पार पडलं. दिगंबर आखाड्याच्या प्रमुख महाराजांना इतर साधुंनी खांद्यावर उचलून घेतलं आणि रामकुंडावर आणलं.
पंचदशनाम आखाड्याला पहिल्या शाही स्नानाचा मान मिळालाय. हरी गिरी महाराजांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
आवाहन आखाड्याचं शाही स्नान कुशावर्तावर पार पडलं.. शाही स्नानाचा दुसरा मान आवाहन आखाड्याला मिळतो..
शाही स्नानाचा तिसरा मान श्री पंचायती अग्नी आखाड्याला मिळला.
शाही स्नानाचा चौथा मान श्री पंचायती निरंजन आखाड्याला मिळाला.
शाही स्नानाचा पाचवा मान श्री पंचायती आनंद आखाड्याला मिळाला.
तर, पंचायती महानिर्वाण आखाड्याला शाही स्नानाचा सहावा मान मिळाला.
नाशिकमध्ये शाही स्नानासाठी शाही मिरवणूक निघालेली पाहायला मिळतेय. या मिरवणुकीत साधू महंतांचा उत्साह पाहायला मिळतोय. रथावरुन साधूंची मिरवणूक काढण्यात आलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.