पोगरवाडीत शोकाकुल वातावरण... लष्करी इतमामात #अखेरचानिरोप

शहीद कर्नल संतोष महाडिकांचं पार्थिव अनंतात विलीन झालं. मंत्रोच्चार आणि लष्करी इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. संतोष महाडिक यांच्या सहा वर्षाच्या मुलानं त्यांना मुखाग्नी दिला. 

Updated: Nov 19, 2015, 01:04 PM IST
पोगरवाडीत शोकाकुल वातावरण... लष्करी इतमामात #अखेरचानिरोप title=

पोगरवाडी: शहीद कर्नल संतोष महाडिकांचं पार्थिव अनंतात विलीन झालं. मंत्रोच्चार आणि लष्करी इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. संतोष महाडिक यांच्या सहा वर्षाच्या मुलानं त्यांना मुखाग्नी दिला. 

दुपारी १२ वाजता

शहीद कर्नल संतोष महाडिकांना लष्करी मानवंदना... मंत्रोच्चारात अखेरचा निरोप

त्यांना सहा वर्षांचा लहान मुलगा

सकाळी ११ वाजता

पोगरवाडीत शोकाकुल वातावरण... लष्करी इतमामात #अखेरचानिरोप, 

राज्य सरकारचे मंत्री एकनाथ शिंदे, चंद्रकांत पाटील उपस्थित, अनेक राजकीय नेते अंत्यसंस्काराला उपस्थित

सकाळी ९.३० वाजता

शहीद संतोष महाडिक यांचं पार्थिव आरेदरेत दाखल, लष्करी इतमामात होणार अंत्यसंस्कार

पोगरवाडीच्या वीरावर गावकऱ्यांची पुष्पवृष्टी,शहीद संतोष महाडिकांच्या अंत्यदर्शनाला अलोट गर्दी, अंत्यसंस्काराच्या मार्गावर रांगोळ्या 

LIVE- शहीद संतोष महाडिकांचं पार्थिव पोगरवाडीत दाखल, वीराला अखेरचा निरोप देण्यासाठी गावकऱ्यांची गर्दी

सातारा: शहीद कर्नल संतोष महाडिक यांचं पार्थिव साताऱ्यात दाखल झालंय. संपूर्ण गावात शोकाकूल वातावरण आहे. पार्थिव साताऱ्यात दाखल होताच नातेवाईकांना आणि नागरिकांना अश्रू अनावर झाले. यावेळी भारत माता की जय, 'संतोष महाडिक अमर रहे'च्या घोषणांनी महाडिक यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

आणखी वाचा - शहीद महाडिकांच्या आईच्या अश्रूंचा बांध फुटला

रात्रभर महाडिक यांचं पार्थिव जिल्हा सामान्य रुग्णालयात ठेवण्यात आलं. त्यानंतर पार्थिव संतोष यांच्या वडिलांच्या गावी आरेदरे इथं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलंय.

त्यानंतर पोगरवाडीत पार्थिव नेलं जाईल आणि दहा वाजताच्या सुमारास कर्नल संतोष महाडिक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

आणखी वाचा - कर्नल संतोष महाडिक यांना श्रीनगर इथं मानवंदना 

कुपवाडा इथं दहशतवाद्यांशी लढतांना कर्नल संतोष महाडिक यांना वीरमरण आलं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.