भक्तीमय वातावरणात बाप्पाला निरोप!

दहा दिवस ज्याची धामधुमीत पूजा-अर्चना केली, तो सर्वांचा लाडका गणपती बाप्पा आज आपल्या गावी निघतोय. आज अनंत चतुर्दशी... राज्यात सगळीकडे बाप्पाला निरोप द्यायची लगबग सुरू आहे.

Updated: Sep 9, 2014, 07:58 AM IST
भक्तीमय वातावरणात बाप्पाला निरोप! title=

अपडेट ४.५० वाजता :  पुणे- तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन

गुरूजी तालिम गणपती अलका चौकात दाखल

 

अपडेट ४.४४ वाजता : राज्यात गणपती विसर्जनाला भक्तांचा महापूर

कसबा गणपती टिळक चौकातून मार्गस्थ

राज्यात ठिकठिकाणी कड़कोट बंदोबस्त

गणेश मिरवणुकीवर २१८ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर 

कोल्हापूर, नागपुरातही गणेश विसर्जन मिरवणूक

सकाळी

लालबागच्या राजाच्या मिरवणुकीला सुरूवात... वाजत-गाजत निघाला राजा

पुण्यातल्या गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात... मानाचे पाच गणपती निघाले...

अजित पवारांनी केली दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती

विसर्जन मिरवणूकीत अल कायदाच्या दहशतवाद्यांचा धोका
दुचाकी, चारचाकी वाहनांमध्ये विस्फोटक ठेवले जाण्याची शक्यता
मुंबई पोलीस आयुक्तांनी घेतली बैठक

'गणेश गल्लीचा राजा'च्या मिरवणुकीला सुरूवात... बाप्पाच्या जयघोषानं रस्ते दुमदुमले...

मुंबई: दहा दिवस ज्याची धामधुमीत पूजा-अर्चना केली, तो सर्वांचा लाडका गणपती बाप्पा आज आपल्या गावी निघतोय. आज अनंत चतुर्दशी... राज्यात सगळीकडे बाप्पाला निरोप द्यायची लगबग सुरू आहे.

ज्या उत्साहात बाप्पाचं आगमन झालं होतं त्याच उत्साहात बाप्पाला निरोप देण्यात येतोय. संपूर्ण दिवसभर चालणाऱ्या या विर्सजन मिरवणुकीसाठी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी कालपासूनच कार्यकर्ते तयारीला लागले आहेत. बाप्पाला झोकात निरोप देण्यासाठी सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांची तसंच घराघरात जंगी तयारी सुरू आहे.
 
मुंबईत गिरगाव चौपाटीवर सर्वाधिक गणपतींचं विसर्जन होतं असतं, त्यामुळं इथं पोलीस यंत्रणा आणि महापालिकेचे कर्मचारी आणि राज्य सरकार सगळ्या यंत्रणा दिवसभर गणरायाच्या विसर्जनासाठी मेहनत घेत आहेत. मुंबईतील सर्व समुद्र किनाऱ्यावर पालिका आणि पोलीस प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे.
 
तसंच गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला मुंबई, पुण्यासह संपूर्ण राज्यात कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आलीय. पुण्यात मानाच्या गणपतींनी मिरवणुकीला सुरुवात केलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.