फिरायला गेलेल्या प्रेमी युगलला दहा जणांनी केली मारहाण

जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यातील एक प्रेमी युगल अर्धापुर शहराजवळील शेतात एकांतात फिरण्यासाठी गेले होते. तेंव्हा याच भागातील सुमारे ८ ते १० जणांच्या टोळक्याने या युगुलाला गाठलं आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. 

Updated: Jun 16, 2015, 11:24 AM IST
फिरायला गेलेल्या प्रेमी युगलला दहा जणांनी केली मारहाण title=

नांदेड : जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यातील एक प्रेमी युगल अर्धापुर शहराजवळील शेतात एकांतात फिरण्यासाठी गेले होते. तेंव्हा याच भागातील सुमारे ८ ते १० जणांच्या टोळक्याने या युगुलाला गाठलं आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. 

युवकाला तर लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. त्याचबरोबर युवतीलाही धमकावत तिचा विनयभंग करण्यात आला. महत्त्वाचं म्हणजे हा सर्व प्रकारचं या टोळक्यातीलच काही जणांनी मोबाईलवर शुटींगही केले. 

लातूरप्रमाणेच सुरुवातीला यातील पीडित तरुण आणि तरुणी गप्प होते. मात्र या प्रकाराचे व्हीडियो सर्वत्र वॉट्स अॅप आणि सोशल मीडियावर फिरू लागल्यानंतर यातील पीड़ित तरुणाने अर्धापूर पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली असून या तक्रारीवरुन १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

यातील काही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतरांचाही तपास सुरु आहे. सर्व आरोपी हे अर्धापूर येथीलच रहिवासी आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.