महाड अपघात: बसंतकुमारने वाचवल्या शेकडो गाड्या

सावित्री नदीवरील पूलमध्येच वाहून गेल्यानंतर, एकानंतर एक गाडी यात कोसळत होती. बसंतकुमार हा गॅरेजमध्ये काम करणारा मॅकेनिक यावेळी आपल्या घराच्या छतावर बसून गाड्यांचे हेडलाईट्स पाहत होता, पण त्याला लक्षात आलं की लाईट्स अचानकमध्ये बंद होत आहेत. एकानंतर एक अशा तीन गाड्या कोसळताना बसंतकुमारने पाहिल्या.

Updated: Aug 3, 2016, 06:54 PM IST
महाड अपघात: बसंतकुमारने वाचवल्या शेकडो गाड्या title=

महाड : सावित्री नदीवरील पूलमध्येच वाहून गेल्यानंतर, एकानंतर एक गाडी यात कोसळत होती. बसंतकुमार हा गॅरेजमध्ये काम करणारा मॅकेनिक यावेळी आपल्या घराच्या छतावर बसून गाड्यांचे हेडलाईट्स पाहत होता, पण त्याला लक्षात आलं की लाईट्स अचानकमध्ये बंद होत आहेत. एकानंतर एक अशा तीन गाड्या कोसळताना बसंतकुमारने पाहिल्या.

बसंतकुमारने १०० नंबरला फोन केला, पण शंभर नंबरला फोन लागला नाही. यानंतर बसंतकुमारने आपल्या मॅनेजरला फोन केला, त्यांनी मी पोलीस स्टेशनला फोन करतो असं सांगितलं, यानंतर आपण रस्त्यावर येऊन गाड्या थांबवल्या. 

माझ्यासमोर तीन गाड्या नदीत कोसळल्या

माझ्यासमोर तीन गाड्या नदीत कोसळल्या. दोन गाड्या नदीत कोसळल्या तोपर्यंत बसंतकुमारला कळलंच नाही, हे गाड्यांचे लाईट अचानक दिसेनासे का होत आहेत.

यात कोणतीही एसटीबस नव्हती

बसंतकुमार या प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या समोर तीन गाड्या नदीत कोसळल्या, मात्र यात कोणतीही एसटीबस नव्हती, तर खासगी फोर व्हिलर्स होत्या. बसंतकुमार यावर म्हणतो की, एसटी बस याआधीच कोसळल्या असाव्यात, मी दरम्यान कुणाचाही ओरडण्याचा आवाज ऐकला नसल्याचंही बसंतकुमारने सांगितलं.

ही घटना रात्री साडेअकरा दरम्यान आपण पाहिली

बंसतकुमार या प्रत्यक्षदर्शीने सांगितलं, ही घटना रात्री साडेअकरा दरम्यान आपण पाहिली, आणि अकरा चाळीसपर्यंत आपण रस्त्यावर येऊन हा रस्ता बंद केला, पुढे जाऊ नका गाड्या पाण्यात पडतायत, पूल तुटला असावा, असं बसंतकुमार सांगत होताय.