महाड दुर्घटना : आंजर्ला समुद्रकिनाऱ्याजवळ सापडला वाहून गेलेल्या बस चालकाचा मृतदेह

महाडमधल्या सावित्री नदीतील शोधकार्य आज सकाळी पुन्हा सुरू करण्यात आलंय. 

Updated: Aug 4, 2016, 09:20 AM IST
महाड दुर्घटना : आंजर्ला समुद्रकिनाऱ्याजवळ सापडला वाहून गेलेल्या बस चालकाचा मृतदेह title=

रायगड : महाडमधल्या सावित्री नदीतील शोधकार्य आज सकाळी पुन्हा सुरू करण्यात आलंय. 

एका वाहन चालकाचा मृतदेह सापडला

महाड दुर्घटनेत वाहून गेगेल्या दोन एसटी बसेसपैंकी एका बस चालकाचा मृतदेह एनडीआरएफच्या हाती लागलाय. उल्लेखनीय म्हणजे, जवळपास १५० किलोमीटर लांब आंजर्ला समुद्रकिनाऱ्याजवळ हा वाहून गेलेला मृतदेह सापडलाय. श्रीकांत एस. कांबळे असं त्यांचं नाव आहे. जयगड-मुंबई (एमच-२० बीएल- १५३८) या गाडीचे चालक कांबळे यांच्या बॅचचा नंबर ८२३४ असा आहे. दुर्दैव म्हणजे, या घटनेत मुलाखतीसाठी निघालेला त्यांचा मुलगा महेंद्र कांबळे हादेखील याच गाडीतून प्रवास करत होता. मृतदेहाजवळ सापडलेल्या बॅचवरून या मृतदेहाची ओळख पटलीय.

कांबळे कुटुंबियांवर शोककळा

महाड दुर्घटनेत वाहून गेलेल्या जयगड मुंबई बसमधील चालक श्रीकांत कांबळे आणि त्यांचा मुलगा महेंद्र कांबळे हे दोघेही प्रवास करत होते.  वाहक कांबळेचा मुलगा महेंद्र कांबळे हा नुकताच सावर्डे महाविद्यालयातून प्रथम आला होता. महेंद्रला बारावीला विज्ञान शाखेत ८१.८५ टक्के गुण मिळाले होते. दरम्यान कांबळे परिवारावर शोककळा पसरली आहे.

कसा सापडला मृतदेह

आंजर्ले किनाऱ्यावर सकाळी ७ वाजल्याच्या सुमारास मॉर्निंग वॉकला गेलेल्या काही स्थानिक रहिवाशांना हा मृतदेह किनाऱ्यावर दिसला. या मृतदेहावर एसटी बॅचही होता. त्यानंतर या रहिवाशांनी पोलीस पाटलांना फोन करून याची माहिती दिली.

तपासाची कक्षा वाढवण्याची आवश्यकता

एनडीआरएफचं सर्च ऑपरेशन आत्तापर्यंत ४० किलोमीटरपर्यंत आंबेतच्या खाडीपर्यंत शोध सुरू होता. पण, कांबळे यांचा मृतदेह अपघात स्थळापासून जवळपास १५० किलोमीटर लांब सापडल्यानंतर आता तपासाची कक्षा वाढवण्याची आवश्यकता असल्याचं दिसतंय.