यंदा पाऊस समाधानकारक

शेतक-यांना दिलासा देणारी बातमी स्कायमेट या हवामानाचा अंदाज वर्तवणा-या संस्थेने दिलाय. 

Updated: Apr 16, 2015, 09:06 PM IST
यंदा पाऊस समाधानकारक  title=

मुंबई : शेतक-यांना दिलासा देणारी बातमी स्कायमेट या हवामानाचा अंदाज वर्तवणा-या संस्थेने दिलाय. 

यंदा समाधानकारक मान्सून होईल असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. यंदाचा मान्सून तांदूळापासून कपाशी, ऊसापर्यंतच्या पिकांना दिलासादायक असेल असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. 

पावसाळ्याच्या सुरूवातीला समाधानकारक पाऊस येईल असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. 27 मेलाच केरळमध्ये मान्सून दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. 

१) जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीच्या 102 टक्के पाऊस पडणार

२) गेल्या 50 वर्षांत भारतात सरासरी 89 सेंमी पावसाची नोंद

३) यंदा लवकर आणि भरपूर पाऊस पडणार, 27 मेपासून मान्सूनला सुरूवात

४) पावसामुळे अन्नधान्य उत्पादन वाढणार, आर्थिक धोरणांना गती मिळणार

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.