नंदूरबार : मराठा क्रांती मोर्चाच वादळ नंदुरबार जिल्ह्या देखील अनुभवत आहे. आदिवासीबहुल या जिल्ह्यात क्रांतीमोर्चा निमित्त मराठा समाजाची ताकद दिसून आली.
नंदुबारमध्ये असणाऱ्या मोर्चाला सुमारे चाळीस विविध समाजाच्या संघटनांनी पाठिबा दिला आहे. कोपर्डी बलात्कार प्रकरण, आरक्षणाची मागणी यासाठी मराठा समाज इतर समाजासोबत नंदुरबारात एकवटला आहे.
या मोर्चात गुजरात मध्य प्रदेश या राज्यातुनही विविध समाजाचे लोक सहभागी झालेत. मोर्चानिमित्त नंदुरबारकडे येणारी सर्व वाहतुक वळविण्यात आली आहे. नंदुरबारच्या मोर्चात पोलीस प्रशासनाने अपेक्षीत केलेल्या जनसमुदायापेक्षा जास्त गर्दी मोर्चात दिसून येत आहे.