सातारा : 'एका धावत्या लग्नाची गोष्ट'.....ऐकून थोडेसे वेगळं वाटतयं ना....! साताऱ्यातील एका जोडप्याने तब्बल २५ किलोमीटर धावत येत विवाह केला आहे. नवनाथ डीगे आणि पूनम चिकने यांनी ही अनोखी संकल्पना राबवली आणि त्या संकल्पनेला अनेकांनी उस्फुर्त प्रतिसाद देखील दिला. हा लग्न सोहळा अतिशय उत्साहात पार पडला.
सातारा हिल मॅरेथॉनची टीम, घरचे पाहुणे, नातेवाईक आणि नवरदेव सगळेच सकाळी ६ वाजताच साताऱ्यापासून २५ किलोमीटर वरील मेढा या गावातून धावत निघाले. ही आगळी-वेगळी संकल्पना पाहण्यासाठी जागोजागी अऩेक लोक जमले होते.
साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातल्यानंतर विवाह नोंदणी कार्यालयात हा विवाह सोहळा पार पडला. अगदी सध्या पद्धतीने कोणताही अनावश्यक खर्च टाळून हा विवाह सोहळा पार पडलाय. आपल्या
शरीरासाठी धावणे किती महत्वाचं आहे, हाच संदेश नवनाथ आणि पूनम यांनी या विवाह सोहळ्यातून दिला आ