पुणे भाजपच्या उमेदवारीत बापट-काकडेंमध्ये स्पर्धा

भाजपने पुण्यासाठी १३९ उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यात तब्ब्ल ६० जागांवर संजय काकडे समर्थकांची वर्णी लागली आहे. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 3, 2017, 09:08 PM IST
पुणे भाजपच्या उमेदवारीत बापट-काकडेंमध्ये स्पर्धा title=

पुणे : महापालिकेत बाजी मारण्यासाठी भाजपने कंबर कसली असताना वर्चस्वासाठी पालकमंत्री गिरीष बापट आणि खासदार संजय काकडे यांच्यात जोरदार स्पर्धा लागली होती. पण उमेदवारांच्या यादीत मात्र काकडे यांचं वर्चस्व दिसून आलं. 

भाजपने पुण्यासाठी १३९ उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यात तब्ब्ल ६० जागांवर संजय काकडे समर्थकांची वर्णी लागली आहे. 

आरपीआयसाठी १२ जागा सोडल्या आहेत. तर, आठ ते दहा जागांवर अदयाप उमेदवार जाहीर झालेले नाहीत. राज्यसभेचे खासदार असलेले काकडे भाजपचे सहयोगी सदस्य आहेत. त्यांनी अनेक उमेदवार इतर पक्षातून भाजपमध्ये आयात केले आहेत. 

भाजपच्या यादीत त्यातील अनेकांना संधी देण्यात आलीय. पक्षाबाहेरील नेत्यांची आणि बाहेरील उमेदवारांची एवढ्या मोठ्या प्रमाणात वर्णी लागण्याची ही पहिलीच वेळ आहे.