मराठवाड्यात दमदार पाऊस, बीडमधील नद्यांना पूर

मराठवाड्यात दमदार पाऊस झाला आहे. तर बीड जिल्ह्यात पावसानं सरासरीची मर्यादा ओलांडली आहे. जिल्ह्यात सरासरीच्या १०० पॉईंट ३८ टक्के इतका पाऊस झाला आहे.

Updated: Sep 24, 2016, 05:47 PM IST
मराठवाड्यात दमदार पाऊस, बीडमधील नद्यांना पूर  title=

बीड : मराठवाड्यात दमदार पाऊस झाला आहे. तर बीड जिल्ह्यात पावसानं सरासरीची मर्यादा ओलांडली आहे. जिल्ह्यात सरासरीच्या १०० पॉईंट ३८ टक्के इतका पाऊस झाला आहे.

जिल्ह्यातील तब्बल ४१ ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये बीड तालुक्यातल्या पेडगावमध्ये सर्वाधिक १८० मिलीमीटर पाऊस झाला आहे. शहराला पाणी पुरवठा करणारं बिंदुसरा धरण ओसंडून वाहू लागलं आहे. माजलगाव धारण ७० टक्के भरले आहे.

गेवराई, माजलगाव,धारूर आणि परळी तालुक्यातल्या काही गावांत पुराचे पाणी घुसल्यानं या गावांचा संपर्क तुटला. जालना जिल्ह्यातही जोरदार पाऊस बसरला. त्यामुळे ठिकठिकाणच्या नदयानाल्यांना पूर आला आहे. यामुळे बळीराजा चांगलाच सुखावला आहे.

या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना चांगलाच आधार मिळालाय. मात्र नदयानाल्यांना आलेल्या पुरामुळे अनेक ठिकाणची वाहतूक विस्कळीत झाली होती. ती आता पुन्हा सुरळीत सुरु झाली आहे. परतूर तालुक्यातल्या दुधना नदीवरचं निम्न दुधना धरण ९१ टक्के भरलं असून, या धरणाचे ८ दरवाजे उघडण्यात आलेत. त्यामुळे या धरणातून ७ हजार क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग केला जात आहे.