पुणे : राज्यभर वटपौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळाला. पतीचे दीर्घायुष्य आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी महिलांनी वडाची पूजा केली. नाशिकमध्येही वटपौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळाला. सध्याची नोकरी करणारी स्त्री ही अधिक सुशिक्षित झालीय. त्यामुळं वेळ आणि पैसा यांना महत्व येऊन व्रतांचे महात्म्य कमी झालंय असे म्हटले जाते.
पिंपरी चिंचवडमधल्या सांगवी इथं अनोख्या पद्धतीनं वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. सावित्रीऐवजी इथं आधुनिक युगातील सत्यवान वडाची पूजा करतायत. पतीला दीर्घायुष्य मिळावं आणि जन्मोजन्मी तोच नवरा मिळावा यासाठी सावित्री वडाची पूजा करते. मात्र आता जग बदललंय. पुरुषाच्या खांद्याला खांदा भिडवून नाही तर त्यांच्या पुढं जाऊन महिला प्रगती करतायत. याचीच प्रचिती येथे आली आहे. पत्नीला दीर्घायुष्य लाभावं आणि जन्मोजन्मी हीच जोडीदार म्हणून लाभावी यासाठी ही पूजा करण्यात आली.
पुरुषांच्या या उपक्रमाचं महिलांनीही कौतुक केलंय.
वटपौर्णिमा हा महिलांचा सण. मात्र स्त्री-पुरुष समानतेच्या या युगात पुरुष मंडळींनी केलेली ही वडाची पूजा नक्कीच कौतुकास्पद म्हणावी लागेल.