ठाणे : नोटबंदीच्या निर्णयानंतर संपूर्ण देशात सर्वत्र बँकांच्या आणि एटीएमच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे. या रांगांचा फटका नोकरदारापासून तर अधिकाऱ्यांपर्यंत आणि सर्वसामान्य माणसांपासून पोलिसांपर्यंत सर्वानाच बसला आहे.
मात्र बंदोबस्तात अडकलेल्या पोलिसांना रांगेत उभे राहणे शक्य होत नसल्याने पोलिसांची मोठी गैरसोय होत असल्याचे दिसून येत होते. त्या अनुषंगाने पोलिसांची गैरसोय टाळण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तलयात एक्सीस बँकेच्या मायक्रो एटीएम मशीनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पुढील दहा दिवस या सुविधेचा लाभ ठाणे पोलीस आयुक्तालयातील बंदोबस्तावर असलेले व ड्युटीवर असलेल्या पोलिसांना घेता येणार आहे.