ओवैसींच्या सभेला पुण्यात परवानगी नाकारली, आता नागपूरचं काय?

MIMचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्या पुण्यातील उद्याच्या सभेला परवानगी नाकारली असतानाच, या महिन्याच्या अखेरीस त्यांची नागपूरला सभा होऊ घातली आहे. नागपूरला पक्षाचं नेटवर्क वाढवण्याकरता ही सभा होणार असल्याचं सांगितलं जातंय. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या त्यांच्याच बालेकिल्ल्यात आव्हान देण्यात येणार असल्याचं MiM चे विदर्भ प्रवक्ते शकील अहमद पटेल यांनी म्हटलंय.

Updated: Feb 3, 2015, 02:44 PM IST
ओवैसींच्या सभेला पुण्यात परवानगी नाकारली, आता नागपूरचं काय? title=

नागपूर: MIMचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्या पुण्यातील उद्याच्या सभेला परवानगी नाकारली असतानाच, या महिन्याच्या अखेरीस त्यांची नागपूरला सभा होऊ घातली आहे. नागपूरला पक्षाचं नेटवर्क वाढवण्याकरता ही सभा होणार असल्याचं सांगितलं जातंय. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या त्यांच्याच बालेकिल्ल्यात आव्हान देण्यात येणार असल्याचं MiM चे विदर्भ प्रवक्ते शकील अहमद पटेल यांनी म्हटलंय.

भारत हा धर्मनिरपेक्ष देश असून संघाच्या हिंदुत्ववादी भूमिकेला आपला विरोध असल्याचंही ते म्हणाले. आपला पक्ष पूर्णपणे धर्मनिरपेक्ष असल्याचा दावाही पटेल यांनी केलाय.

२८ फेब्रुवारीला होणाऱ्या या सभेला परवानगी मिळेल अशी खात्री आहे. तसं झालं नाही पक्ष पुढील विचार करेल, असंही ते म्हणाले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.