बाप्पासाठी पुण्यात रंगली मोदक स्पर्धा!

बाप्पाचा आवडता पदार्थ म्हणजे मोदक. त्यामुळं गणेशोत्सवात मोदकांचं महत्त्व औरच असतं. पुण्यात प्रबोधन संस्थेनं आयोजित केलेल्या मोदक स्पर्धेत तब्बल 2 हजार 200 महिला सहभागी झाल्या होत्या. साहजिकच वेगवेगळ्या प्रकारचे मोदक या ठिकाणी पाहायला मिळाले. 

Updated: Aug 31, 2014, 08:51 PM IST
बाप्पासाठी पुण्यात रंगली मोदक स्पर्धा! title=

पुणे: बाप्पाचा आवडता पदार्थ म्हणजे मोदक. त्यामुळं गणेशोत्सवात मोदकांचं महत्त्व औरच असतं. पुण्यात प्रबोधन संस्थेनं आयोजित केलेल्या मोदक स्पर्धेत तब्बल 2 हजार 200 महिला सहभागी झाल्या होत्या. साहजिकच वेगवेगळ्या प्रकारचे मोदक या ठिकाणी पाहायला मिळाले. 

गणपती बाप्पाचा नैवेद्य मोदकाशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळं गणेशचतुर्थीच्या दिवशी प्रत्येक घरात मोदक हा बनवलाच जातो. उकडीचे मोदक, तळणीचे मोदक या सारख्या पांरपारिक मोदकांप्रमाणेच चॉकलेट मोदक, काजू मोदक, ड्रायफ्रूट मोदक यासारखे वेगवेगळे मोदकाचे प्रकारही अलिकडच्या काळात खवय्यांसाठी मोठी पर्वणी ठरत आहेत. 

मोदकांचा हाच बदललेला ट्रेंड लक्षात घेऊन पुण्यातल्या प्रबोधन संस्थेनं मोदक स्पर्धेचं आयोजन केलं होतं. यामध्ये लहान मुलींपासून आजींपर्यंत सर्वच वयोगटातल्या महिलांनी मोठ्या उत्साहानं हजेरी लावली होती. फारसे माहित नसलेले मोदकांचे प्रकारही या स्पर्धेत पाहायला मिळाले. बटाटा गुलकंदाचे मोदक... रवा गाजर मोदक, शुगर फ्री मोदक यांच्यासह मुगाच्या डाळीचे मोदक, मावा मोदक, आंबा मोदक असे वेगवेगळे मोदक या स्पर्धेतल्या स्पर्धकांनी बनवले होते.

स्पर्धेचं ठिकाण असंख्य मोदकांनी भरलेला असताना ते खाण्याचा मोह अनेकांना आवरला नाही. एकूणच काय तर या स्पर्धांच्या निमित्तान पुणेकर महिलांचं मोदक कौशल्य पहायला मिळालं हे मात्र नक्की. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.