आता, नाशिक - मुंबई हवाईप्रवास पुन्हा सुरू होणार!

नाशिक शहरातून पुन्हा एकदा मुंबईसाठी एअर अलायन्सची सेवा सुरु होणार आहे. २७ मार्चपासून ही सेवा सुरू होणार आहे.

Updated: Feb 3, 2016, 10:49 PM IST
आता, नाशिक - मुंबई हवाईप्रवास पुन्हा सुरू होणार!

मुंबई : नाशिक शहरातून पुन्हा एकदा मुंबईसाठी एअर अलायन्सची सेवा सुरु होणार आहे. २७ मार्चपासून ही सेवा सुरू होणार आहे.

दिवसातून दोन वेळा ही सेवा देण्यात येणार आहे. ATR-2-600 हे नवीन विमान नाशिकरांच्या सेवेत रुजू होणार आहे. या विमानातून एकाचवेळी ७२ प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. यामुळं नाशिकही आता हवाई वाहतुकीच्या नकाशावर येणार आहे. 

मुंबई जवळ असल्यामुळं नाशिककर विमानसेवेला कमी प्रमाणात प्रतिसाद देत असल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे. मात्र, हिंदूस्तान एरोनॉटीक्स लिमिटेड, सरकार आणि काही कंपन्यांनी सीट्स शेअर करण्याच्या आश्वासनामुळं ही सेवा अखंडीत सुरू राहण्याची अपेक्षा आहे.

यापूर्वी, किंगफिशरसह इतर खाजगी कंपन्यांनी सेवा सुरु केली. मात्र ती यशस्वी ठरली नाही. आता गो एअर, डेक्कन कंपन्यांनी नाईट हॉल्टिंगसाठी प्रस्ताव पाठविल्यानं नाशिकची विमानसेवा सुरू राहण्याची आशा निर्माण झाली आहे.