नांदेडमध्ये ९ नगरपरिषद आणि २ नगरपंचायतीसाठी मतदान

तिस-या टप्यात एकूण 22 पालिकांपैकी नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक 11 पालिकांच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं. 9 नगरपरिषद आणि 2 नगरपंचायतीसाठी निवडणुका पार पडल्या. 197 नगरसेवक पदासाठी 793 तर 9 नगराध्यक्ष पदासाठी 53 उमेदवारांचं भवितव्य मतदानयंत्रात बंद झालं आहे.

Updated: Dec 18, 2016, 06:36 PM IST
नांदेडमध्ये ९ नगरपरिषद आणि २ नगरपंचायतीसाठी मतदान title=

नांदेड : तिस-या टप्यात एकूण 22 पालिकांपैकी नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक 11 पालिकांच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं. 9 नगरपरिषद आणि 2 नगरपंचायतीसाठी निवडणुका पार पडल्या. 197 नगरसेवक पदासाठी 793 तर 9 नगराध्यक्ष पदासाठी 53 उमेदवारांचं भवितव्य मतदानयंत्रात बंद झालं आहे.

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांचे होम पीच असल्याने काँग्रेससाठी ही निवडणूक महत्वाची आहे. तर राष्ट्रवादी, सेना, भाजपनेही येथे जोरदार प्रचार केला आहे. त्यामुळे आता सत्ता कोणाच्या हातात येणार हे पाहावं लागेल.