पुणे : पुणे मेट्रोचं काम नागपूर मेट्रो कंपनी करणार नाही, असा खुलासा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. नागपूर मेट्रो कॉर्पोरेशनकडं केवळ सहा महिन्यासाठी तात्पुरता चार्ज देण्यात आला आहे. पुणे मेट्रोचं काम महाराष्ट्र मेट्रो कॉर्पोरेशन या कंपनीकडून केलं जाईल. येत्या दोन आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळाची पुणे मेट्रोला मंजुरी मिळेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
पुणे मेट्रोचं काम नागपूर मेट्रोला देण्यास भाजप वगळता सर्वच पक्षांनी जोरदार विरोध केला होता. मात्र आता गडकरींच्या खुलाशामुळं या वादावर पडदा पडणार आहे.