नागपूर : नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात उद्या-परवा सुटी आहे. त्यामुळे नागपूरातून मुंबईपर्यंतची सर्व विमान तिकिटं विकली गेलीत. तिकीटे संपल्याने विमान कंपन्यांनी आपल्या तिकीट दरात वाढ केलेय. दरम्यान, तर नागपूर-पुणे-मुंबई मार्गावरील तिकीट ४०,००० पेक्षा जास्त दरात विकलं गेलंय.
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवडयाचे कामकाज आज संपत असल्याने साहजिकच मंत्री, आमदार, अधिकारी, आणि नेते मुंबईला परतणार आहे. त्यामुळं या मार्गावर प्रवासी वाढल्याने साहजिकच मागणी वाढलीय. परिणामी मागणी वाढली की प्रवास भाडे वाढवण्याच्या पद्धतीप्रमाणे विमान कंपन्यांनी प्रवासी भाडे वाढवलंय.
एकीकडे नागपूर-मुंबई सरळ मार्गावर विमानाची एकही तिकीट शिल्लक नाही, तर दुसरीकडे या मार्गावर शेवटचे तिकीट २२,००० पेक्षा जास्त किंमतीने विकलं गेलंय. तर नागपूर-पुणे-मुंबई मार्गावरील तिकीट ४०,००० पेक्षा जास्त दरात विकलं गेलंय.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा आणि त्या आधी दिवाळी दरम्यान देखील याच प्रकारे तिकिटांचे दर वाढले होते... तर क्रिसमस आणि वर्ष अखेर परत एकदा हेच दर आणखी वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.