मुंबई : नोटबंदीच्या मुद्यावरुन काँग्रेस आमदार नारायण राणे यांनी, विधानपरिषदेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
स्वतःचेच कष्टाचे पैसे बँकेतून काढण्याकरिता, सामान्यांना लांबलचक रांगांमध्ये उभं राहावे लागत आहे. यात आतापर्यंत 80 हून जास्त निरपराधांचा मृत्यू झाल्याच्या गंभीर बाबीकडे राणेंनी यावेळी लक्ष वेधले. ग्रामीण भागातल्या अर्ध्या जनतेचे नोटबंदीमुळे अतोनात हाल होत असल्याचं त्यांनी सांगितले.
दरम्यान, नागपूर अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधकांनी नोटबंदीवरून गदारोळ केला. तर दुसरीकडे विरोधकांची कोंडी करण्यासाठी शिवसेना-भाजप या सत्ताधारी पक्षांनीच मराठा आरक्षणाचा प्रस्ताव चर्चेला दिला आहे.