हक्काचे पैसे मागितले म्हणून बँक मॅनेजरची शेतकऱ्याला मारहाण

अस्मानी संकटांनं ग्रासलेल्या मराठवाड्यातल्या बळीराजावर आता सुलतानी अत्याचार सुरू झाले आहेत.

Updated: Jul 14, 2015, 12:58 PM IST
हक्काचे पैसे मागितले म्हणून बँक मॅनेजरची शेतकऱ्याला मारहाण title=
प्रातिनिधिक फोटो

नांदेड : अस्मानी संकटांनं ग्रासलेल्या मराठवाड्यातल्या बळीराजावर आता सुलतानी अत्याचार सुरू झाले आहेत.

नांदेड जिल्ह्यातल्या जिल्हा बँकेंच्या नवीन मोंढा शाखेच्या मॅनेजरनं आपल्या हक्काचे पैसे घ्यायला आलेल्या शेतकऱ्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. 

बँकेत ऊसाचे पैसे घेण्यासाठी गेलेल्या या शेतकऱ्यानं विलंब होत असल्यानं मॅनेजरला विचारणा केली. त्यावरून राग आल्यानं मॅनेजरनं क्लार्कसह प्रभू भोरे या शेतकऱ्याला मारहाण करत बँकेतून हाकलून लावलं.

ही घटना समजल्यानंतर युवा सेनेचे कार्यकर्ते तिथे पोहोचले. शेतकऱ्याची माफी मागण्याची मागणी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी केली... पण मॅनेजर माफी मागण्यास नकार दिला... तेंव्हा युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी मॅनेजर सुनील सोळंके याला मारहाण केली.

जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य अधिकारी श्रीकांत कदम घटनास्थळी पोहोचले. त्यांनी माफी मागितल्यानंतर शेतकरी शांत झाले. बँक मॅनेजर सोळंकेवर कारवाई करण्याचे आश्वासन कदम यांनी दिलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.