'घरच्यांसोबत न राहिल्यामुळे मोदींना काय चाललंय कळत नाही'

घरच्यांसोबत न राहिल्यामुळे समाजात काय चाललं आहे हे मोदींना कळत नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली आहे. 

Updated: Dec 23, 2016, 08:06 PM IST
'घरच्यांसोबत न राहिल्यामुळे मोदींना काय चाललंय कळत नाही' title=

बारामती : घरच्यांसोबत न राहिल्यामुळे समाजात काय चाललं आहे हे मोदींना कळत नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली आहे. आमच्या घरचे समाजात आमच्याबद्दल काय बोलतात हे स्पष्टपणे सांगतात, पण मोदींना असं सांगणारं कोणीच नाही असं अजित पवार म्हणाले आहेत.

वादग्रस्त वक्तव्यामुळे आता मी ताकही फूंकन पित असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत. ए शहाण्या कोणताच शब्द चुकीचा जाऊन देऊ नकोस, असं मी माझ्या दुसऱ्या मेंदूला सांगत असतो, अशी कबुली अजितदादांनी दिली आहे.

शिवस्मारकाच्या भूमिपूजनावरूनही अजित पवारांनी भाजप सरकारला लक्ष्य केलं आहे. महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमुळे शिवस्मारकाचं भूमिपूजन करण्यात येत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलमधल्या स्मारकाचं भूमिपूजन झाल्यानंतरही तिथे एक खड्डाही खणला नसल्यांचं अजित पवार म्हणाले.