नाशिकमध्ये एका प्रभागात २३ महिला रिंगणात

महापालिका निवडणुकीत यंदा महिलांना 50 टक्के आरक्षण आहे. मात्र नाशिकमध्ये तर महिलांनी पुरूषांच्या जागांवरही हक्क सांगितलाय. सातपूर औद्योगिक वसाहतीत एका प्रभागात तर चक्क 23 महिला रिंगणात आहेत. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 15, 2017, 01:48 PM IST
नाशिकमध्ये एका प्रभागात २३ महिला रिंगणात title=

नाशिक : महापालिका निवडणुकीत यंदा महिलांना 50 टक्के आरक्षण आहे. मात्र नाशिकमध्ये तर महिलांनी पुरूषांच्या जागांवरही हक्क सांगितलाय. सातपूर औद्योगिक वसाहतीत एका प्रभागात तर चक्क 23 महिला रिंगणात आहेत. 

या आहेत फरीदा शेख त्यांचा प्रभाग क्रमांक 11 हा सातपूर कामगार बहुल भागात येतो. या परिसरातील दहा आणि अकरा प्रभागात चाळीसहून अधिक महिला आपले नशिब आजमावीत आहेत. विशेष म्हणजे फरिदा शेख अल्पसंख्यक असल्या तरी त्या मुस्लिम नसलेल्या प्रभागातून मनसेकडून लढत आहेत.. त्यांचे पती शेजारील प्रभागात उमेदवारी करत असून आपली खिंड एकाकी लढवीत आहेत   
 
नाशिक शहरातील एकूण १२२ जागा बघता ६१ महिला उमेदवार पक्षांनी देणं गरजेचं आहे. मात्र प्रमुख राजकीय पक्षांनी यात एक पाउल पुढे टाकलंय. सर्वाधिक 64 महिला उमेदवार शिवसेनेत तर त्या खालोखाल 63 महिला भारतीय जनता पार्टीने दिलेल्या आहेत. त्या खालोखाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 51, राष्ट्रवादीने 29, काँग्रेसने 26 महिलांना प्रतिनिधित्व दिलंय. 

प्रभाग क्रमांक 20 मध्ये सर्वात कमी म्हणेज चार महिला आहेत. अपक्ष म्हणून महिलांचा भरणा अधिक असल्याने या वेळेस महापलिकेत महिला नगरसेवक सर्वाधिक विराजमान होण्याची  शक्यता आहे.