नाशिक : शहरातील मध्यवर्ती कारागृहात मध्यरात्री पुन्हा आठ मोबाइल सापडले आहे. याप्रकरणी नाशिक रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक मध्यवर्ती कारागृहात कैद्यांकडे मोबाईल सापडल्याच्या प्रकरणाचा पर्दाफाश झी 24 तासने 14 डिसेंबरला केला. कैदी जेलमधून मोबाईलवर खुलेआम बोलत असल्याचंच दिसून आले.
जेल प्रशासनाच्या कारभाराचीही या निमित्ताने चौकशी सुरू झाली. मात्र हा प्रकार उघड होण्याच्या आधीच एक दिवस म्हणजे 13 डिसेंबरलाच नाशिक जेलला मध्य विभागातील सर्वोत्कृष्ट जेल जाहीर करण्यात आले आहे.
याचे पत्रच झी 24 तासच्या हाती लागले आहे. जेलमध्ये खुलेआम फोनवरून बोलणारे कैदी दिसत असताना कशाच्या आधारावर या जेलला सर्वोत्कृष्ट ठरवण्यात आलं असा सवाल उपस्थित होत आहे.