नाशकात बहिणीसोबत खेळणाऱ्या चार वर्षीय चिमुरडीचं अपहरण

नाशिक जिल्ह्यात आणि शहर परिसरात गुन्हेगारीनं कळस गाठलाय. दिवसाढवळ्या एका चारवर्षांच्या चिमुरडीचं अपहरण झालंय. सातपूर पोलिसांत गुन्हा दाखल झालाय. अनेक तास उलटून गेले तरीही पोलिसांच्या हाती काही लागलेलं नाही. 

Updated: May 15, 2015, 10:31 PM IST
नाशकात बहिणीसोबत खेळणाऱ्या चार वर्षीय चिमुरडीचं अपहरण title=

नाशिक: नाशिक जिल्ह्यात आणि शहर परिसरात गुन्हेगारीनं कळस गाठलाय. दिवसाढवळ्या एका चारवर्षांच्या चिमुरडीचं अपहरण झालंय. सातपूर पोलिसांत गुन्हा दाखल झालाय. अनेक तास उलटून गेले तरीही पोलिसांच्या हाती काही लागलेलं नाही. 

नाशिकच्या सातपूर अंबड लिंक रोडवरील महेंद्र शर्मा यांच्या घरासमोरून त्यांच्या चार वर्षांच्या नंदिनी या मुलीचं अपहरण झालंय. सकाळी आठच्या सुमारास ती आपल्या बहिणीसोबत खेळत असताना पांढऱ्या कारमधून आलेल्या अज्ञात व्यक्तीनं तिचं अपहरण केलं. 

या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झालाय. सीसीटीव्हीद्वारे शोध सुरू आहे. शर्मा यांचा जमिनीचा किंवा व्यवसायाचा काही वाद आहे का याचाही पोलीस शोध घेत आहेत. 

 नाशिकच्या सातपूर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारीने उच्चांक  गाठलाय. लागोपाठ दोन तीन खुनाच्या घटना नाशिक परिसरात घडल्या आहेत. लुटमार करणाऱ्या टोळक्यांचा धुडगूस वाढला आहे. त्यातच एका चिमुरडीचंही अपहरण झालंय.  त्यामुळे परिसरात घबराटीचं वातावरण आहे. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.