राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष आझम पानसरे भाजपमध्ये

पिंपरी-चिंचवडच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष आझम पानसरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. 

Updated: Jan 9, 2017, 08:12 AM IST
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष आझम पानसरे भाजपमध्ये title=

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष आझम पानसरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. 

ऐन निवडणूकीच्या तोंडावर पानसरे भाजपची कास धरल्यानं राष्ट्रवादीला जोरदार धक्का बसलाय. पानसरेंच्या जाण्यानं महापालिका निवडणुकीआधी अजित पवार एकटे पड़ल्याची चर्चा सध्या पिंपरी-चिंचवडच्या राजकीय वर्तुळात रंगतेय. 

आता विलास लांडे सोडले तर सर्व बड्या नेत्यांनी अजित पवारांची साथ सोडलीय. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये सत्ता टिकवणं राष्ट्रवादीला कठीण जाणार आहे.