राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडलेत, जयंत पाटील यांचा काढता पाय

येथील राष्ट्रवादी मेळाव्यादरम्यान राडा पाहायला मिळाला. राष्ट्रवादी कार्यकर्ते एकमेकाला भिडलेत. कार्यक्रम स्थळाची तोडफोड करण्यात आली. यावेळी नेते जयंत पाटलांचे भाषण सुरु होते. त्याचवेळी बाहेर हाणामारी झाली.

Updated: Jun 9, 2016, 09:57 PM IST
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडलेत, जयंत पाटील यांचा काढता पाय title=

सांगली : येथील राष्ट्रवादी मेळाव्यादरम्यान राडा पाहायला मिळाला. राष्ट्रवादी कार्यकर्ते एकमेकाला भिडलेत. कार्यक्रम स्थळाची तोडफोड करण्यात आली. यावेळी नेते जयंत पाटलांचे भाषण सुरु होते. त्याचवेळी बाहेर हाणामारी झाली.

माजी मंत्री आणि आमदार जयंत पाटील यांच्या भाषणादरम्यान राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडलेत. कार्यकर्त्यांनी घटनास्थळी मोठी तोडफोड केली. या घटनेची माहिती मिळताच जयंत पाटील यांनी घटनास्थळावरुन काढता पाय घेतला. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन करण्याचे सौजन्य न दाखवता, असे निघून जाणे योग्य नाही, अशी कुजबूज सुरु होती.