प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर: मुंबई बॉम्बस्फोटातला प्रमुख आरोपी दाऊद इब्राहिमला भारतात आणण्याबाबत होत असलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. जेठमलानी म्हणतात म्हणून दाऊद भारतात येणार होता हे खरं मानायचं का? असा सवालही त्यांनी केलाय.
राज्यात दुष्काळाचं सावट, शरद पवारांचं भाकित
तर राज्यात दुष्काळाचं सावट येणार असल्याचं भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत वर्तविलं आहे.
राज्यातील आणि केंद्रातील सरकार बदललं असून या सरकारनं शेतकऱ्यांच्या अपेक्षा भंग केल्या आहेत. आमचे सरकार असताना नेहमीच शेतकऱ्यांना पाठिशी होते आणि त्यांना मदत करत आले आहे. याचबरोवर ऊस उत्पादकांना योग्य असा भाव देण्याचं काम केलं असल्याचं यावेळी शरद पवार सांगितलं.
साखरेला अनुदान देण्याची जबाबदारी सरकारची असून याबाबत कोणतेही निर्णय घेतले जात नसून उसाला एफआरपीनुसार दर दिला जात नाही. याला काहीप्रमाणात कोल्हापूर जिल्हाच जबाबदार असल्याचं शरद पवार म्हणाले. तसंच, केंद्र सरकारनं साखरेचे पडलेले भाव लक्षात घेऊन आर्थिक मदत जाहीर केली, मात्र ही मदत ऊस उत्पादकांना नसून ती साखर कारखान्याना केली असल्याचंही ते म्हणाले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.