कोल्हापूर : नोटबंदीमुळे रोख रक्कम काढण्याकरता, बँक आणि एटीएमबाहेर लांब रांगा लागत असल्याचं चित्र सगळीकडेच पाहायला मिळतंय. ग्रामीण भागात ही स्थिती जास्तच चिंताजनक आहे. यावर आयसीआयसीआय बँकेनं बँक ऑन व्हील ही नावीन्यपूर्ण योजना आणली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यामधल्या कागल तालुक्यातल्या चार गावांत ही योजना सध्या सुरु आहे. या योजनेंतर्गत दुर्गम आणि बँकेची शाखा नसलेल्या भागातल्या रहिवाशांच्या दारापर्यंत, एटीएमसहित बँकेच्या सर्व सुविधा पोहोचवल्या जात आहेत. विशेष म्हणजे आयसीआयसीआय बँक 2013 सालापासूनच बँक ऑन व्हील ही योजना दुर्गम भागासाठी राबवत आहे.
यामध्ये बँकेची एक गाडी बँकेच्या सर्व प्रकारच्या सेवासुविधा घेऊन आठवड्यातून दोन दिवस, दुर्गम गावात दाखल होते. ग्रामस्थांनी या योजनेचं विशेष कौतुक केलं आहे.