राज्यात पाणीटंचाईनंतर आता वीजेचं संकट

 राज्यावर पाणीटंचाईनंतर आता वीजेचं संकटही ओढवलंय. पाणी, गॅस आणि कोळशाअभावी वीजनिर्मितीवर विपरित परिणाम झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी नाशिक इथं दिली. 

Updated: Jul 1, 2014, 02:20 PM IST
राज्यात पाणीटंचाईनंतर आता वीजेचं संकट title=

नाशिक : राज्यावर पाणीटंचाईनंतर आता वीजेचं संकटही ओढवलंय. पाणी, गॅस आणि कोळशाअभावी वीजनिर्मितीवर विपरित परिणाम झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी नाशिक इथं दिली. 

पाण्याअभावी कोयना, तर गॅसअभावी दाभोळ प्रकल्पात वीजनिर्मितीचं काम बंद झालंय. धरणातील पाणीसाठे संपल्याबरोबरच आता कोळसाही संपत आल्यानं वीजनिर्मितीवर गंभीर परिणाम झालाय. कोळशाअभावी परळीत दोन संच बंद करण्यात आलेत. नाशिक जिल्ह्यातल्या एकलहरा वीजनिर्मिती केंद्रात केवळ चौदा दिवस कोळसा पुरेल अशी परिस्थिती आहे.

कोळसा मिळत नसल्यानं राज्य सरकारनं आता केंद्रासमोर गुडघे टेकले असून सेंट्रल ग्रीड किंवा खाजगी कंपन्यांकडून वीज घेण्याचे प्रयत्न करतायत. पाणी आणि वीज मिळणं आवश्यक असताना अशा परिस्थितीत वारी सुखरूप पार पाडणं आवाहन ठरत असल्याची कबुलीही अजित पवार यांनी दिलीय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.