अकोला : अकोला शहरातील गोरक्षण भागातील विजय हाऊसिंग सोसायटीच्या सर्व्हिस गल्लीत १००० आणि ५०० चा नोटा जाळलेल्या स्थितीत आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या नोटांची एकूण किंमत ५८ हजारांच्या आसपास आहे.
दुपारी दोनच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आलाय. शहरातील गोरक्षण रोड भागात नावाजलेली विजय हाऊसिंग सोसायटी आहेय. आज दुपारी या हाऊसिंग सोसायटीच्या सर्व्हीस गल्लीत कचरा वेचणार्या महिलेला काहीतरी जळत असल्याचं दिसलंय.
जवळ गेल्यावर जळत असलेल्या १००० आणि ५०० च्या बंद करण्यात आलेल्या नोटा असल्याचं या महिलेच्या लक्षात आलंय. विशेष म्हणजे या सर्व्हीस गल्लीत तीन ठिकाणी नोटांना आग लावून त्या जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. या घटनेची माहिती कचरा वेचणाऱ्या महिलेने लगेच विजय हाऊसिंग सोसायटीतील रहिवाशी राजू केडीया यांना दिलीय.
केडीया यांनी या प्रकाराची माहिती लगेच खदान पोलीस स्टेशनला दिलीय. गोरक्षण रोड भागात या प्रकाराची माहिती वार्यासारखी पसरलीय. अन घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झालीय. तोपर्यंत पोलीस घटनास्थळी दाखल झालेय. मात्र, त्याआधी येथील अनेक नोटा लोकांनी लांबविल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिलीये.
दरम्यान, पोलीसांनी या जळालेल्या आणि काही अर्धवट जळालेल्या स्थितीत असलेल्या नोटा जप्त केल्यायेत. नोटा जाळणाराचा शोध पोलीसांनी सुरू केलाय. तीन ठिकाणी जाळण्यात आलेल्या या नोटांचा नेमका आकडा कळू शकला नाहीय. मात्र, ही रक्कम विस लाखांवर असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.