मुंबई: वेगळ्या मराठवाड्याचा विषय काढून राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी पुन्हा नवीन वाद निर्माण केलाय. त्याचे पडसाद विधिमंडळात उमटले आहेत.
या मुद्द्यावरुन शिवसेनाही आक्रमक झाली आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी अणेंची तुलना ओवेसीशी केली आहे. तसंच अणेंचा आजच राजीनामा घ्या अशी मागणी शिवसेना आणि विरोधकांनी केली आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्थगन प्रस्ताव मांडला आहे. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी श्रीहरी अणेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी मात्र या प्रकरणी मौन बाळगलंय. ऐन अधिवेशऩातच पुन्हा एकदा राज्याचे तुकडे करण्याची भाषा करणाऱ्या अणेंना आता अणेंना नेमकं कोण पाठिशी घालतंय हा प्रश्न निर्माण होतोय.