सावधान! माळीणची पुनरावृत्ती कोकणात होण्याची शक्यता

पुण्यातल्या आंबेगाव तालुक्यातल्या माळीणमधल्या दुर्घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातेय. मात्र ही घटना कोकणासाठी अॅलर्ट आहे. माळीणची पुनरावृत्ती कोकणात होण्याची शक्यता आहे. अशा घटनात कोकणात याआधी जीवितहानीही झालीय. एकट्या रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल 38 ठिकाणी दरडी कोसळण्याची शक्यता आहे.   

Updated: Aug 1, 2014, 09:10 PM IST
सावधान! माळीणची पुनरावृत्ती कोकणात होण्याची शक्यता title=

रत्नागिरी: पुण्यातल्या आंबेगाव तालुक्यातल्या माळीणमधल्या दुर्घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातेय. मात्र ही घटना कोकणासाठी अॅलर्ट आहे. माळीणची पुनरावृत्ती कोकणात होण्याची शक्यता आहे. अशा घटनात कोकणात याआधी जीवितहानीही झालीय. एकट्या रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल 38 ठिकाणी दरडी कोसळण्याची शक्यता आहे.   

कोकणातल्या कोणत्याही गावात गेल्यास उंच डोंगर, बाजूला नदी, डोंगर उतारावर दाटीवाटीनं वसलेली घरं हे चित्र पाहायला मिळेल. इथली परिस्थितीही काही प्रमाणात माळीण गावासारखीच. कोकणात डोंगर उतारावर बंगल्यांसाठी खोदकाम केलं जात आहे. निसर्गाचा अभ्यास न करता सर्रास खोदकाम करत बांधकामं सुरू आहेत. त्यामुळं जमिनीला तडे गेलेत. घरांना भेगा पडल्यात. खेड तालुक्यातल्या नातूनगरमध्ये नागरिकांना प्लॅस्टीक अंगणात अंथरून पाण्याचा निचरा करावा लागत आहे. 

खेडच्या नातूनगरमधलं हे उदाहरण बोलकं आहे. माळीण गावातल्या दुर्घटनेप्रमाणे कोकणातही दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. राजापुरात वडदहसोळ आणि दापोलीतल्या हर्णे गावातल्या दुर्घटनेत 16 जणांना प्राण गमवावे लागले होते. या घटनांना पाच वर्ष उलटली तरी पुनर्वसन झालेलं नाही. जिल्ह्यात भू- अभ्यासकांनी जिल्ह्यात १६ गावांमध्ये अशा पद्धतीने दरडी कोसळण्याच्या शक्यता असल्याचा अहवाल दिलाय. तर आपत्कालीन विभागानं तब्बल ३८ गावात जमीन खचण्याची भीती असल्याचं स्पष्ट केलं.

माळीण गावातल्या घटनेप्रमाणे घटना रत्नागिरी जिल्ह्यातही घडू शकतात. कोकणात प्रचंड पाऊस होतो. लालमातीचे डोंगर आहेत. खडकाळ भाग तुलनेत कमी आहे. त्यात मातीच्या डोंगरावर अनियंत्रित खोदकाम आणि वृक्षतोड केली तर इथेही अशा घटनांचे धोके आहेत. जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारने तातडीने इथे लक्ष देण्याची गरज आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.