शीना बोरा प्रकरणात पोलीस अधिकारी अडकणार?

शीना बोरा हत्येप्रकरणी दुर्लक्ष करणाऱ्या पोलीस अधिकारी अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे. या प्रकरणावरून पोलीस दलातील अधिकारी खडबडून जागे झाले आहेत, कोणत्याही प्रकरणाच्या चौकशीत दुर्लक्ष केलं तर प्रकरण कसं अंगावर येऊ शकतं, याचं हे एक उत्तम उदाहरण पोलिस दलासाठी आहे.

Updated: Sep 3, 2015, 03:06 PM IST
 शीना बोरा प्रकरणात पोलीस अधिकारी अडकणार? title=

रायगड : शीना बोरा हत्येप्रकरणी दुर्लक्ष करणाऱ्या पोलीस अधिकारी अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे. या प्रकरणावरून पोलीस दलातील अधिकारी खडबडून जागे झाले आहेत, कोणत्याही प्रकरणाच्या चौकशीत दुर्लक्ष केलं तर प्रकरण कसं अंगावर येऊ शकतं, याचं हे एक उत्तम उदाहरण पोलिस दलासाठी आहे.

पोलीस खात्याला २०१२ साली २३ मे रोजी सकाळी १० वाजता, गाढोदे ब्रुद्रूक गावाजवळ, ज्या ठिकाणी शीना बोराचा मृतदेह सापडला होता, त्यावेळी तत्कालीन पोलीस उपअधीक्षक प्रदीप चव्हाण, निरीक्षक सुरेश मिरघे, उपनिरीक्षक सुनील धांडे यांनी या प्रकरणात हात झटकले असल्याचं आता समोर येत आहे. 

या प्रकरणी खुनाचा किंवा इतर गुन्हा दाखल न करता बेवारस मृतदेह म्हणून 'स्टेशन डायरी'त नोंद करीत प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला, असं मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासात उघड झाले आहे. 

पेण पोलिसांनी त्यावेळी पंचनामा करून मृतदेहाचे काही अवशेष चाचणीसाठी जे. जे. रुग्णालयात पाठवले होते. हे अवशेष ७० टक्के जळालेले असल्याने चाचणी करण्यास अयोग्य असल्याचे रुग्णालय प्रशासनाने पेण पोलिसांना कळवले देखील होते, मात्र त्यानंतर पोलिसांनी जे. जे. रुग्णालयाशी काहीच संपर्क साधला नसल्याचं सांगण्यात येतंय.

यानंतर काही दिवस वाट पाहून शीनाच्या मृतदेहाचे अवशेष गागोदे खिंडीतच पुरून निष्काळजीपणाचा कहर केल्याचा आरोप पोलिसांवर होतोय. त्यातच तत्कालीन पोलीस अधीक्षक आर. डी. शिंदे यांनी हा तपास थांबवण्याचे आदेश पेण पोलिसांना दिल्याचेही सांण्यात येतंय.

आता या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस महासंचालक संजीव दयाळ यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. 

 तत्कालीन पोलिस अधीक्षक आर. डी. शिंदे यांनी तपास थांबवण्याचे पेण पोलिसांना दिले होते. पेण पोलिसांनी तपासात दाखवलेला निष्काळजीपा आणि त्यानंतर आदेश हे सर्वच संशयास्पद असल्याचं सध्या तरी सांगितलं जातंय, या प्रकरणात हात झटकणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे हात शीना बोरा हत्याकांड प्रकरणात अडकण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.