सिंधुदुर्ग/औरंगाबाद: ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वाईन फ्लूमुळे दोघांचा मृत्यू झालाय. शिवाय रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतेय. सोनवडेपार आणि नेरुर नदी किनाऱ्यावरच्या दोन गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
आणखी वाचा - मुंबईत बळावतोय स्वाईन फ्लू, आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू
राज्याचे आरोग्य मंत्री दीपक सावंत सिंधुदुर्गातले असूनही जिल्ह्यात लोकांच्या आरोग्याची प्रचंड हेळसांड होतेय. गणपतीला मुंबईसह राज्यभरातून चाकरमानी मोठ्या संख्येनं कोकणात जात असतात. मात्र ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर जिल्ह्यात स्वाईन फ्लूनं तोंडवर काढलं असताना जिल्हा प्रशासन मात्र हालचाल करताना दिसत नाहीये.
तर तिकडे औरंगाबाद शहरात स्वाईन फ्लूचा दुसरा बळी गेलाय. सिडको एन-4 इथल्या महिलेचा स्वाईन फ्लूनं मृत्यू झालाय.
आणखी वाचा - जेजे रुग्णालयात निवासी डॉक्टरलाच स्वाईन फ्लू ...
पूनम हरिओम गुप्ता असं या महिलेचं नाव आहे. धूत हॉस्पिटलमध्ये या महिलेवर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झालाय. स्वाईन फ्लूचा विळखा वाढत असताना महापालिका मात्र निद्रिस्त असल्याचं दिसून येतोय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.