मुंबई : पोटच्या मुलीचा सौदा करणाऱ्या एका निर्दयी आईला पोलिसांनी अटक केली आहे. देहविक्रीसाठी या मुलीची विक्री केली जात होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
विशेष म्हणजे बहिणीच्या मुलीचे लग्न थाटात करण्यासाठी आईच मुलीचा सौदा करत होती. गोंवडीतील ही महिला आपल्या १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला मुंबईहून ठाण्याला घेऊन आली.
ही माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या महिला व्यापार प्रतिबंधक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना मिळाली होती.
लूईसवाडी येथे एका हॉटेलमध्ये सदर महिलेवर कारवाई करुन त्या महिलेला अटक केले आहे. आरोपी महिला सेक्स रॅकेट चालवते, या महिलेचे तीन लग्न झाले
आहेत. पीडित मुलगी ही तिच्या पहिल्या पतीची असून महिलेला आणखी तीन मुली आहेत.
भाचीच्या लग्नासाठी पाच लाखात आपल्या मुलीला देहविक्री करण्यासाठी भाग पाडत होती. आईने आपल्या मुलीला देहविक्री करण्यास दोन वर्षांपूर्वीच प्रवृत्त
केल्याची माहिती समोर आली आहे. वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.