नाशिकला मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार

नाशिक शहरातील मीनाताई ठाकरे स्टेडियमच्या बाहेर पोलिसांनी लाठीमार केला आहे. प्रभाग क्रमांक ३ ची मतमोजणी थांबवण्यात आली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 23, 2017, 08:49 PM IST
नाशिकला मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार title=

नाशिक : नाशिक शहरातील मीनाताई ठाकरे स्टेडियमच्या बाहेर पोलिसांनी लाठीमार केला आहे. प्रभाग क्रमांक ३ ची मतमोजणी थांबवण्यात आली आहे. यंत्र चुकीची आकडेवारी देत असल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे. मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात गोंधळ असल्यामुळे मतमोजणी बंद आहे. 

मतदान यंत्रातील गोंधळामुळे मतं वाढवल्याची अफवा पसरल्याने,  मतदान केंद्रासमोर मोठा जमाव जमला, आणि गोंधळ झाल्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. पोलिसांनी यावेळी अरेरावी करत मीडियाच्या पत्रकारांवरही लाठीमार केला.

या प्रभागात एकूण मतदान ३८ हजार ९७३ एवढे आहे, यात २३ हजार एवढे मतदान झाले आहे, मात्र २७ हजार मतदान झाल्याचं यंत्र दाखवत असल्याचा उमेदवारांचा आरोप आहे. मात्र ही अफवा असल्याचीही चर्चा दुसऱ्या बाजूला आहे.

२  दिवसात अतिरिक्त ४ हजार मतदान अधिक झाल्याच्या आरोपांमुळे मतमोजणी प्रक्रिया थांबवली होती. मात्र यानंतर क्रमांक ३ ची मतमोजणी संथ गतीने सुरू करण्यात आली.