पुणे : पुण्यात कार ड्रायव्हर असलेल्या अनिल क्षीरसागर नावाच्या तरूणाला मालकाने जिवंत जाळल्याचा प्रकार घडलाय.
या घटनेत अनिल जवळपास ९० टक्के भाजला. त्याला ससून रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या घटनेत कारमालक असलेल्या धनंजय घुले आणि त्याच्या चार साथीदारांना ताब्यात घेण्यात आलंय. अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा क्षीरसागर कुटुंबीयांनी घेतल्यावर अखेर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
तरवडे वस्ती, मोहम्मदवाडी, हडपसर, पुणे राहणारा एका गरीब घरातील अनिल धनंजय घुले यांच्याकडे कार ड्रायव्हर म्हणून काम करत होता. यावेळी, अनिलनं घुले यांच्याकडून काही पैसे व्याजानं घेतले होते. पैसे वेळेत परत करत नसल्यानं धनंजय आणि त्याच्या साथीदारांनी अनिलला जिवंत जाळलं. गेल्या आठवड्यात शुक्रवारी ही घटना घडली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.