ती टायपिंग मिस्टेक, फर्ग्युसनच्या प्राचार्यांचं घुमजाव

पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधल्या राड्याप्रकरणी प्राचार्यांनी पोलिसांना पत्र लिहिलं होतं.  त्याप्रकरणी धक्कादायक प्रकार समोर आलाय. 

Updated: Mar 23, 2016, 01:24 PM IST
ती टायपिंग मिस्टेक, फर्ग्युसनच्या प्राचार्यांचं घुमजाव title=

पुणे : पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधल्या राड्याप्रकरणी प्राचार्यांनी पोलिसांना पत्र लिहिलं होतं.  त्याप्रकरणी धक्कादायक प्रकार समोर आलाय. 

याप्रकरणी प्राचार्यांनी घूमजाव केलंय. या कार्यक्रमात देशविरोधी घोषणा दिल्याचं पत्रात म्हटलं होतं. पण, ती टायपिंग मिस्टेक होती, असं धक्कादायक घूमजाव प्राचार्यांनी केलंय. मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात देशविरोधी घोषणा दिल्या गेल्या, फर्ग्युसनच्या प्राचार्यांनीच यासंदर्भातलं पत्र पोलिसांना दिलं होत. मात्र, आता त्यांनी यू टर्न घेतलाय.

'कोणतीही परवानगी न घेता कॉलेजच्या आवारात एकत्र येऊन विद्यार्थ्यांच्या एका समूहाने देशविरोधी घोषणा दिल्या. या विद्यार्थ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी', अशी तक्रार प्राचार्यांच्या स्वाक्षरीने डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी लगेचच त्याचा तपासही सुरू केला. मात्र, आज कॉलेजने 'टायपिंग मिस्टेक' म्हणत या तक्रारीवर सपशेल घुमजाव केले आहे. पोलिसांना दिलेल्या पत्रात 'टायपिंग मिस्टेक' झाली. त्यात 'घोषणा दिल्या असल्यास' असा उल्लेख असणं अपेक्षित होतं, असं स्पष्टीकरण आज प्राचार्य रविंद्रसिंह परदेशी यांनी दिलंय. 


हेच ते प्राचार्यांचं पत्र...

 मंगळवारी फर्ग्युसन कॉलेजमध्ये आभाविप कार्यकर्ते आणि आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते समोरासमोर येऊन जोरदार घोषणाबाजी झाली. यावेळी आंबेडकरी चळवळीच्या विद्यार्थ्यांनी अभाविप चलेजाव, कॅसीझमसे आझादी यासह कन्हैया कुमारच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या.

तर दुसऱ्या बाजुला अभाविप कार्यकर्त्यांनी 'भारत माता की जय', 'वंदे मातरम'च्या घोषणा दिल्या. या पार्श्वभूमीवर फर्ग्युसन कॅम्पसमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

पोलिसांनी कार्यकर्त्यांना पागवल्या नंतर तणाव निवळला. हे सगळं घडून गेल्यानंतर फर्ग्युसनाच्या प्राचाऱ्यांनी पोलिसांना पत्र दिलं होतं. देशविरोधी घोषणा देण्यात आल्याचा त्या पत्रात उल्लेख आहे. मात्र, देशविरोधी घोषणा कोणी दिल्या, याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला नव्हता. आता मात्र, ती टायपिंग मिस्टेक असल्याचं प्राचार्य म्हणतायत.