रेल्वे स्थानकांचं बदलणार रूप, राज्यातील ३८ स्टेशन्स होणार चकाचक

देशातील ४०० रेल्वे स्थानकांचं रूप बदलण्याची योजना केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजूर केली आहे. या ४०० रेल्वे स्थानकांमधून सुमारे ३८ महाराष्ट्रातील रेल्वे स्थानके असतील. ही स्थानके कोणती हे अद्यापी स्पष्ट झालेलं नाही.  

Updated: Jul 17, 2015, 05:21 PM IST
रेल्वे स्थानकांचं बदलणार रूप, राज्यातील ३८ स्टेशन्स होणार चकाचक title=

मुंबई : देशातील ४०० रेल्वे स्थानकांचं रूप बदलण्याची योजना केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजूर केली आहे. या ४०० रेल्वे स्थानकांमधून सुमारे ३८ महाराष्ट्रातील रेल्वे स्थानके असतील. ही स्थानके कोणती हे अद्यापी स्पष्ट झालेलं नाही.  

या योजनेसाठी खासगी क्षेत्रातून स्पर्धात्मक टेंडरर्स मागवण्यात आले आहेत. स्थानकांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. 
ही ४०० रेल्वे स्थानके अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज असणार आहेत. ज्या कंपनीकडे हे टेंडर जाईल त्याला रेल्वे स्थानकाच्या परिसरातील जागेचा वापर व्यापारी तत्त्वावर विकास करण्यासाठी दिला जाईल. यातून मिळणाऱ्या पैशांच्या मोबदल्यात या रेल्वे स्थानकांचा गरज लागल्यास पुनर्विकास करता येईल. 
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.