रेल्वेत आता मिळणार कोकणी जेवण

रेल्वेमध्ये सध्या पेंट्रीकारच्या माध्यमातून जेवण व्यवस्था केलेली असते.

Updated: Dec 4, 2016, 08:54 PM IST
रेल्वेत आता मिळणार कोकणी जेवण title=

रत्नागिरी : रेल्वेमध्ये सध्या पेंट्रीकारच्या माध्यमातून जेवण व्यवस्था केलेली असते. पण तिथल्या जेवणाबाबत अनेक तक्रारी असतात. ट्रेन ज्या भागातून जाते तेथील स्थानिक पदार्थ प्रवाशांना उपलब्ध होत नाहीत. मात्र आता या स्थितीत बदल होणार असून फोन किंवा एसएमएस च्या द्वारे आपणाला हवे असणारे जेवण उपलब्ध होणार आहे.

देशातील पहिल्या इकैटरिंग पायलट प्रोजेक्टचे उदघाटन सावंतवाडीमध्ये रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केले. विशेष म्हणजे महिलांना  सक्षम करण्यासाठी इकैटरिंगची किचन बचत गटांच्या ताब्यात दिली जाणार आहेत. सध्या ही सेवा कोकण रेल्वेत सुरु करण्यात आली असून आता प्रवासा दरम्यान सागोती-वडे, माशांवर ताव मारता येणार आहे.

प्रवाशांना तिकीट काढताना आपला सीट नंबर आणि स्टेशनचा उल्लेख केल्यानंतर ही सेवा मिळणार आहे. अन्यथा sms आणि फोनद्वारेही या सेवेचा लाभ घेता येणार आहे. कोकणातील ही स्वयंसहाय्यता बचतगटाची चळवळ संपूर्ण देशात एक सामाजिक क्रांती निर्माण  करेल असे गौरोद्गार सुरेश प्रभू यांनी उदघाटन समयी काढले. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर,खासदार विनायक राऊत उपस्थित होते.